लॉकडाऊनची ऐशी की तैशी; पुणे, सोलापुरात अंत्ययात्रांना हजारोंची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नियंत्रणात यावा. नागरिकांचे जीव वाचावेत यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन जीवापाड प्रयत्न करत आहे. मात्र अनेक ठिकाणी लॉकडाऊनची ऐशी की तैशी सुरू आहे. पुणे आणि सोलापूरातील तर धक्कादायक प्रकार घडले. तिथे अंत्ययात्रांना हजारोंची गर्दी झाली. त्या गर्दीसमोर पोलिसह हतबल ठरल्याचे दिसून आले.

1 जूनपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. तरीसुध्दा कोरोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. सोलापूरच्या लष्करी भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचे नुकतेच निधन झाले. सोलापूरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू आहे. तरीसुध्दा नियम पायदळी तुडवून म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. त्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसही कमी पडले.

पुण्याच्या बिबवेवाडीत तर कहरच झाला. तेथील सराईत गुंड माधव वाघाटे याची शनिवारी दहा जणांच्या जमावाने हत्या केली होती. वाघाटे याच्या अंत्ययात्रेला 125 पेक्षा जास्त जण दुचाकीवरून सहभागी झाले होते. अंत्यविधीसाठी केवळ 25 जणांनाच परवानगी असताना घावटे याच्या घरापासून कात्रज स्मशानभूमीपर्यंत त्याच्या अंत्ययात्रेत शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू असून पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना ताब्यात घेतले आहे.