धारावीत दिवसभरात 8 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्याही घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसीकरण आणि वाढत्या चाचण्यांमुळे धारावीत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी होत असून धारावीत आज दिवसभरात 8 कोरोना रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारवरून 478 वर आली आहे. धारावीत आतापर्यंत दुसऱया लाटेत आलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. याआधी 13 आणि 14 मे रोजी धारावीत 9 रुग्ण सापडले होते, तर सक्रिय रुग्णांची संख्या 616 इतकी होती.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने धारावीत सुरुवातीपासून विविध प्रतिबंधात्मक तसेच जनजागृती मोहिमांवर भर दिला. महापालिका दुसऱया लाटेत लसीकरण आणि कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर देत आहे. दरम्यान, दादरमध्ये आज 12 तर माहीममध्ये 32 रुग्ण आढळले.

वॉर्डमध्ये व्यक्तीनुसार नियोजन

धारावीत अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या विविध छोटे उद्योग-व्यवसाय करणारी असून यात पुशल कारागीर आहेत. त्यांचे शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्बन हेल्थ सेंटर-धारावी येथे अशा लोकांना थेट लस घेता यावी यासाठी थेट लस देण्यासाठी ‘वॉक इन’ सुविधा तर ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी दादर येथे कोहिनूर येथील पालिकेच्या सार्वजनिक वाहतूकतळावर गाडीत लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला आणि ज्येष्ठ-दिव्यांगांची गैरसोयही टाळता आली.

लसीकरण केंद्रात वाढ

महापालिकेच्या जी-उत्तर विभागात येणाऱया दादर, माहीम आणि धारावीत सुरुवातीला माहीम मॅटर्निटी होम आणि ट्रान्झिट कॅम्प धारावी ही दोनच लसीकरण केंद्रे सुरुवातीला होती. लोकांमध्ये लसीकरणाबाबत जागृती केल्यानंतर लस घेणाऱयांची संख्या वाढू लागली. त्या पार्श्वभूमीवर अर्बन हेल्थ सेंटर-धारावी, श्री सिनेमा माहीम, कोहिनूर पार्पिंग लॉट, सेंट मायकल चर्च-माहीम आणि माटुंगा लेबर कॅम्प येथे तातडीने लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली.