
येथील कळवण एज्युकेशन सोसायटी संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे एनसीसीचे विद्यार्थी कोरोना रोखण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले. ‘सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करा’, ‘मास्क वापरा’ असा सल्ला देत कळवणकरांचे त्यांनी प्रबोधन केले.
‘कोणत्याही व्यक्तीपासून कमीत कमी एक मीटरचे अंतर ठेवा’, ‘अफवांना बळी न पडता लसीकरण करून घ्या’ आदींबाबत जनजागृती करत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहनही या विद्यार्थ्यांनी केले. तसेच गरजू व्यक्तींना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस, डॉक्टर, सफाई कामगारांचे आभार मानले.
एनसीसी छात्र सैनिक यश गवळी, पूजा मोरे, सचिन शिवदे व खुशाली सोनवणे यांनी कोरोनाविषयी जनजागृतीसाठी चित्रफीत बनवली आहे. यासंदर्भात एनसीसी प्रमुख लेफ्टनंट भगवान कच्छवा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे, प्राचार्य डॉ. बी. एस. पगार, उपप्राचार्य प्रा. आर. जे. कापडे, कर्नल ए. के. सिंग यांनी या विद्यार्थ्यांच्या कामाचे काwतुक केले आहे.




























































