मोटारसायकलच्या धडकेत पोलीस जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाकाबंदीदरम्यान मोटारसायकलच्या धडकेत जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जखमी झाले. विठ्ठल गाडेकर असे त्यांचे नाव असून त्याच्यावर व्होक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघातात मोटारसायकलस्वारदेखील जखमी झाला आहे. गाडेकर हे शनिवारी रात्री पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दक्षिण वाहिनीवर नाकाबंदीवर होते. तेव्हा समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला गाडेकर यांनी थांबण्यास सांगितले. त्या मोटारसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने त्याने गाडेकर यांना धडक देऊन तो स्वतःही जखमी झाला. अपघातानंतर त्या दोघांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. गाडेकर यांच्या पायाला जबर इजा झाल्याने त्याला व्होक्हार्ट रुग्णालयात दाखल केले असून रविवारी सायंकाळी त्यांच्या पायावर शस्त्राक्रिया करण्यात आली.