रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उभारले अद्ययावत कोविड केअर सेंटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पोलीसांसाठी स्वतंत्र अद्ययावत पोलीस कोविड केअर सेंटर एमआयडीसी परिसरात उभारले आहे. 50 बेडची क्षमता असलेल्या या कोविड केअर सेंटरचे नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्‌घाटन करण्यात आले. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनावरील उपचार मिळण्यासाठी हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 5 ऑक्सीजन बेडचाही समावेश आहे.