
आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ, इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंट व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने अखिल हिंदुस्थानी ऑनलाईन मोफत प्रवेशाची बुद्धिबळ स्पर्धा दोन गटांत 30 मे रोजी आयोजित केली आहे. या वेळी चारुशीला मोहिते स्मृती अखिल हिंदुस्थानी खुली बुद्धिबळ स्पर्धा तसेच रमेश कडवे स्मृती 14 वर्षांखालील शालेय मुलामुलींसाठी अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ स्पर्धा पार पडणार आहे. प्रत्येक गटांमधील विजेत्या-उपविजेत्यांना 10 रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. स्विस लीग पद्धतीने साखळी नऊ फेऱ्यांमध्ये ही ऑनलाईन स्पर्धा लिचेस प्लॅटफॉर्मवर होईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेशासाठी किंवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजंगी (9324719299 व्हॉट्सअॅपवर) यांच्याकडे 28 मेपर्यंत संपर्क साधावा.

























































