तंत्रज्ञान – कौशल्ये आत्मसात करण्याचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कौस्तुभ सोनाळकर

कोरोना महामारी आणि वाढत चाललेल्या यंत्रांच्या वापराला नोकऱयांमध्ये आलेलं महत्त्व यामुळे अर्थव्यवस्थेला बसलेल्या दुहेरी फटक्याचा परिणाम म्हणून पुढच्या पाच वर्षांत आपल्यापैकी अर्ध्या लोकांना नवीन कौशल्ये शिकण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. नोकऱयांचं स्वरूप बदलताना तेच नवीन कौशल्य शिकण्यासाठी मदत करू शकतं.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ‘फ्युचर ऑफ जॉब्स’च्या (भविष्यातील नोकऱया) अहवालानुसार अधिकाधिक तंत्रज्ञान वापरू लागल्यामुळे 2025पर्यंत सर्व कर्मचाऱयांपैकी 50 टक्के माणसांना नवीन कौशल्य आत्मसात करावं लागेल. नोकरी देणाऱया मालकांच्या मते, पुढच्या पाच वर्षांमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवणाऱया कौशल्यांच्या यादीत विश्लेषणात्मक विचार आणि अडचणींमधून मार्ग काढणे यांचा समावेश असेल. स्वनियोजनाच्या क्षेत्रात नव्याने पुढे येणाऱया कौशल्यांमध्ये सक्रिय शिक्षण, कणखरपणा, ताण सहन करण्याची क्षमता आणि लवचिकता यांचा समावेश आहे. 40 टक्के कर्मचाऱयांना सहा महिने किंवा त्याहून कमी काळासाठी नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतील. कोरोना महामारी आणि वाढत चाललेल्या यंत्रांच्या वापराला नोकऱयांमध्ये आलेलं महत्त्व यामुळे अर्थव्यवस्थेला बसलेल्या दुहेरी फटक्याचा परिणाम म्हणून पुढच्या पाच वर्षांत आपल्यापैकी अर्ध्या लोकांना नवीन कौशल्ये शिकण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. मात्र, ज्या तंत्रज्ञानाच्या तडाख्यामुळे नोकऱयांचं स्वरूप बदलतंय तेच तंत्रज्ञान आपल्याला नवीन नोकऱया निर्माण करण्याची गुरुकिल्ली देऊ शकतं आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी मदतही करू शकतं. आपल्याकडे उपयोगात आणता येईल अशी सामुग्री आहे. आजचा काळ हा तंत्रज्ञानाने लावलेल्या असंख्य नवनवीन शोधांचा आहे. त्याच शोधांचा वापर करून माणसांमधल्या कर्तृत्वाला झळाळी आणणं शक्य होईल.

मोठय़ा प्रमाणावर लोकांना नवीन कौशल्ये शिकवणं आणि असलेली कौशल्ये अधिक घासूनपुसून घेणं, विस्थापित कर्मचाऱयांना संरक्षण देण्याकरता नेमकी सुरक्षितता निर्माण करणे आणि अशा विस्थापित कर्मचाऱयांना भविष्यातील नोकऱयांसाठी तयार करून जगायला शिकवणे यासाठी आवश्यक असलेली साधनं हिंदुस्थानकडे आहेत.

2025 पर्यंत सर्व कर्मचाऱयांपैकी 50 टक्के कर्मचाऱयांना नवीन कौशल्य आत्मसात करावं लागेल.

माझ्या अनुमानानुसार 2025 पर्यंत माणसांऐवजी यंत्रांकडून काम करून घेऊ लागल्याने सुमारे 8.5 कोटी नोकऱया जाऊ शकतात. मात्र माणूस, यंत्र आणि अल्गोरिदम यांच्यामध्ये होणाऱया कामाच्या विभागणीद्वारे त्याहून अधिक म्हणजे 9.7 कोटी नोकऱया नव्याने निर्माण होऊ शकतात.

भविष्यासाठी आवश्यक असलेली ही महत्त्वाची दहा कौशल्यं आहेत. येणाऱया काळात निर्माण होणाऱया नोकऱयांमध्ये ती आवश्यक असणार आहेत. विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी त्यांची मागणी वाढणार आहे. या ‘वेगवेगळ्या प्रकारच्या’ कौशल्यांमध्येच उत्पादनाचं मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग आणि माणूस- कॉम्प्युटर यांच्यातील देवाणघेवाण यासाठी लागणारी विशेष कौशल्यंही आहेत.

नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी किती काळ लागेल?

विविध व्यवसायांमध्ये अग्रेसर असणाऱया अनेकांची आज आपल्या कर्मचाऱयांनी काम करताना नवीन कौशल्य आत्मसात करावं अशी अपेक्षा असते. सुमारे 40 टक्के कर्मचाऱयांना नवीन कौशल्य शिकण्यासाठी सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी काळ लागेल. मात्र, ग्राहक उद्योग आणि आरोग्य व आरोग्य सेवा देणाऱया उद्योगांमध्ये असणाऱयांसाठी हा आकडा मोठा असेल. वित्तीय सेवा आणि ऊर्जा क्षेत्रात, सहा महिन्यांमध्ये नवीन कौशल्य शिकणाऱया कर्मचाऱयांची संख्या कमी असेल, कारण त्यांना अधिक सखोल प्रशिक्षणाची गरज भासेल.

39 टक्के मालकांच्या मते, हे प्रशिक्षण अंतर्गत असेल. कोविडच्या महामारीमुळे मोठय़ा प्रमाणात ऑनलाइन शिक्षण दिलं जाऊ लागलंय. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते जून या काळात कोर्सेसनुसार स्वतःहून संधी शोधणाऱया लोकांची संख्या चारपटीने वाढली होती. आपल्या कर्मचाऱयांसाठी ऑनलाईन शिक्षणाची संधी देणाऱया मालकांची संख्या पाचपटीने आणि सरकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून ऑनलाईन कोर्सेससाठी नाव नोंदवणाऱया प्रशिक्षणार्थींच्या संख्येत नऊपट वाढ झालेली आहे.

हिंदुस्थानने अनेक नवीन धोरणं जाहीर केलेली आहेत. आपल्या कामगारांना कौशल्य देणं, असलेल्या कौशल्यांना अधिक धारदार बनवणं आणि नवीन कौशल्य शिकवणं यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न होत आहेत. कौशल्य विकासाची आपली केंद्रं, आपल्याला इच्छितस्थळी पोचता यावं याकरता जीव तोडून काम करताहेत. जगासाठी कौशल्य देणारं केंद्र म्हणून नावारूपाला येण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनं आपल्याकडे आहेत आणि आपण तिथे निश्चितच पोहोचू शकतो.

लेखक वेलस्पून ग्रुपमध्ये समूह संचालक (ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट, जनरल अफेअर्स, सीएसआर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन) आहेत

10 महत्त्वाची कौशल्यं

तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणं याचा अर्थ पुढच्या पाच वर्षांत विविध नोकऱयांमध्ये आज अत्यावश्यक असलेली कौशल्यं बदलणं आणि या कौशल्यांमधली दरी अधिकाधिक वाढत जाणं. आपलं जुनंच काम करत राहणाऱया कर्मचाऱयांसाठी 2025 पर्यंत मूलभूत कौशल्य 40 टक्के बदलतील आणि सर्व कर्मचाऱयांपैकी 50 टक्के माणसांना नवीन कौशल्य आत्मसात करावं लागेल. (ही वाढ 4 टक्के एवढी आहे). नोकरी देणाऱया मालकांच्या मते, पुढच्या पाच वर्षांमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवणाऱया कौशल्यांच्या यादीत विश्लेषणात्मक विचार आणि अडचणींमधून मार्ग काढणे यांचा समावेश असेल. मात्र, स्वनियोजनाच्या क्षेत्रात नव्याने पुढे येणाऱया कौशल्यांमध्ये सक्रिय शिक्षण, कणखरपणा, ताण सहन करण्याची क्षमता आणि लवचिकता यांचा समावेश आहे.

1) विश्लेषणात्मक विचार 2) सक्रिय शिक्षण 3) गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणे 4) मूल्यमापन आणि विश्लेषण करणे 5) सर्जनशीलता, कल्पकता आणि पुढाकार घेणे 6) नेतृत्व गुण आणि सामाजिक प्रभाव 7) तंत्रज्ञानाचा उपयोग, निरीक्षण आणि नियंत्रण 8) तंत्रज्ञान डिझाईन आणि प्रोग्रॅमिंग करणे 9) कणखरपणा, ताण सहन करण्याची क्षमता आणि लवचिकता 10) कार्यकारणभाव, प्रश्न सोडवणे आणि नवीन कल्पना देणे.