
मालिकांचे शूटिंग कोणत्याही रिसोर्टमध्ये किंवा क्रीप्टमध्ये बदल करून होऊ शकते. मात्र सिनेमांच्या बाबतीत तसे होत नाही.
देशात टप्प्याटप्प्याने अनलॉक झाले तरी बॉलिवूडला ट्रकवर यायला वेळ लागणार आहे. सध्यातरी आऊटडोअर शूटिंगचे काही खरं दिसत नाही. बाहेरगावी शूटिंगसाठी सारंकाही आलबेल व्हायला वेळ लागेल. शिवाय जगभरात अनेक देशांत हिंदुस्थानींच्या प्रवासावर बंदी आहे. त्यामुळे देशविदेशातील लोकेशन्सवर शूटिंग सुरू होणे शक्य नाही. परिणामी आगामी सिनेमांचे आऊटडोअर शूटिंग आणि रिलीज कॅलेंडर बिघडू शकते.
एकीकडे शूटिंगसाठी परिस्थिती पूर्ववत व्हायला वेळ लागत असताना पावसाळा तोंडावर आला आहे. ऐन पावसात आऊटडोअरचा विचारही करता येत नाही. मोठा सेट खराब होऊन फिल्म कंपन्यांचे करोडोंचे नुकसान होऊ शकते. सर्व कर्मचारी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्नही असतो. याशिकाय हिल स्टेशन किंवा जंगल बंद असतात. त्यामुळेही लोकेशन्सचे कांदे होतात. उदाहरण द्यायचे तर गोवा राज्यात मान्सून खूप सक्रीय असतो. गोव्यात पावसाचे दृश्य चित्रित करायचे असतील तर ठीक मात्र पूर्ण पाकसाळ्यात शूटिंग शक्य नसते.
मग पर्याय काय?
हिंदुस्थानातील फिल्म इंडस्ट्री कोणत्याही परिस्थितीत मार्ग वाढताना दिसते. निवांत हातावर हात धरून बसण्यापेक्षा काहीतरी पर्याय शोधण्याकडे कल दिसतो. बेंजामीन जॅकब यांच्या मते ज्यामध्ये आऊटडोअर शूटिंग नसेल अशा क्रीप्टकर काम करता येईल. सेट्स आणि स्टुडियोव्यतिरिक्त फार्महाऊस किंवा रिसोर्टसारख्या वास्तूमध्ये शूटिंग करू शकतो. साऊथ इंडस्ट्रीने तर सुरक्षा आणि सुविधांचा विचार करून उत्तरेकडील ‘रिमोट लोकेशन्स’चा विचार करायला सुरुवात केली आहे.
मनोज वाजपेयी यांच्या शूटिंगला गावकऱयांचा विरोध
अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या सिनेमाचे शूटिंग उत्तराखंडमध्ये नैनीतालच्या सोनपाणी गावात सुरू होते. मात्र तेथील गावकऱयांनी केलेल्या विरोधामुळे शूटिंग थांबवण्यात आले. गावातील लोकांचे म्हणणे आहे की लॉकडाऊन असताना तिथे शूटिंगची परकानगी कशी दिली जाऊ शकते. आता कुठे त्यांच्या भागात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. शूटिंग सुरू झाल्यास जर सिनेमाच्या टीममधील कोणताही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असेल तर पुन्हा कोरोना गावात पसरू शकतो.
वर्षभर नियोजन करावे लागते
आऊटडोअर शूटिंगसाठी खूप दीर्घ नियोजन लागते. क्रीप्टच्या मागणीनुसार दोन ते तीन महिन्यांपासून वर्षभराची आखणी करावी लागते. तांत्रिक बाबी, स्थानिक कामगार आणि शूटिंगच्या आवश्यक परवानगीसह अनेक व्यवस्था बघाव्या लागतात, अशी माहिती एक्झुकेटिव्ह प्रोडय़ुसर दिलीप मिस्त्राr यांनी दिली.
अन्य देशांना पसंती
फिल्म लोकेशन सर्क्हीस कंपनी ‘फिल्मेपिया’चे प्रमुख बेंजामीन जॅकब यांनी दिलेल्या माहितीनुसार ऍड. फिल्म आणि डॉक्युमेंटरीचे शूटिंग सध्या बंद आहेत. अमेरिका आणि युरोपच्या प्रॉडक्शनच्या हाऊस आणि ब्रँडने हिंदुस्थानात शूटिंग पुढे ढकलले आहे किंवा थायलँडसारख्या लोकेशन्समध्ये गेले आहेत.


























































