
कोरोनामुळे सध्या आजूबाजूला निराशाजनक वातावरण आहे. अशा परिस्थितीत व्हायरल होणारे काही व्हिडिओ आपल्या चेहऱयावर हसू फुलवत आहेत तर काही व्हिडिओ आपल्याला जगण्याची प्रेरणा देत आहेत. सध्या एका चार वर्षांच्या अँटोनेला या मुलीचा व्हिडिओ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अनेकांनी तिच्या जिद्दीला सलाम केला आहे. अँटोनेला हिला एक पाय कृत्रिम बसवला आहे. खंदकावर चढण्यासाठी तिला किती संघर्ष करावा लागतोय ते या अवघ्या 58 सेकंदांच्या व्हिडिओमधून दिसतेय. अँटोनेला खंदकाबाहेर येण्यासाठी आईची मदत मागते. परंतु तिची आई तिला स्कतŠच बाहेर येण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. अँटोनेला साधारण पाच केळा घसरते. परंतु वारंवार तिची आई तिला प्रोत्साहन करते. अखेरीस ती यशस्वीरीत्या खंदकावर येते. मोठय़ाने ओरडत आपला आनंद व्यक्त करते.




























































