धारावी बनतेय निगेटिव्ह, दिवसभरात 1 रुग्ण, 19 सक्रिय रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब नेहमी पडणाऱया धारावीत आज केवळ एक रुग्ण सापडला तर सक्रिय रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 591 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे धारावी हळूहळू निगेटिव्ह बनत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने मुंबईभर विविध मोहिमा राबवल्याच, पण मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीसाठी ‘मिशन धारावी’, ‘मिशन झीरो’सारख्या विशेष मोहीम राबवल्या. एकाच शहरात धारावीसारख्या दाटीवाटीच्या विभागासाठी अशी वेगळी व्यूहरचना असलेली कोरोनाविरोधातील मोहीम मुंबई महापालिकेने तयार केली आणि ती धारावीकरांच्या कलेने राबवली. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर धारावीत आजही लसीकरणासाठी विविध भाषांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. दरम्यान, धारावीत आतापर्यंत 20 हजारपेक्षा जास्त जणांचे लसीकरण झाले आहे.

एकही कंटेनमेंट झोन नाही

मुंबईतील पालिकेच्या 13 वॉर्डमध्ये सध्या एकही कंटेनमेंट झोन नाही. यात धारावी येत असलेल्या जी-उत्तर विभागाचाही समावेश आहे. धारावीत सध्या एकही चाळ आणि झोपडपट्टी ही पंटेनमेंट झोनमध्ये नाही, ही धारावीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक बाब आहे. मात्र मायक्रो पंटेनमेंट झोनमध्ये 10 ठिकाणांचा समावेश आहे, तर 214 मजले हे सील करण्यात आले आहेत.