
सातारा जिल्ह्यात लोणंद-नीरा रस्त्याकरून आलिशान गाडीतून दारूची अवैध काहतूक करणाऱया कोरेगाव येथील तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून देशी दारूचे बॉक्स, बीअरच्या बाटल्यांचा एक बॉक्स असा 93 हजार 480 रुपये किमतीचा माल व लाखो रुपयांची आलिशान गाडी जप्त केली आहे.
धीरज संजय बर्गे (रा. आझाद चौक, कोरेगाव), मयूरेश हनुमंत शिंदे (रा. संभाजीनगर, कोरेगाव), योगेश उर्फ बाबासाहेब आनंदराव बर्गे (रा. अजिंक्य कॉलनी, कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशाल कायकर यांना नीरा ते लोणंद रस्त्याने अवैध दारू वाहतूक होत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार लोणंद पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून संशयित आलिशान गाडी अडविली. गाडीतून 93 हजार रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला. यावेळी तिघांना अटक केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, संतोष नाळे, अमोल अडसूळ, महेंद्र सपकाळ, अभिजित घनकट, फय्याज शेख आदींनी कारवाईत सहभाग घेतला.




























































