
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई-लेहा रस्त्यावर बनकर फाट्यानजीक शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एक गाडी उलटून अपघात झाला. या अपघातात वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या रस्त्यावर आल्यावर वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्याशेजारील पोलला धडकली आणि रस्त्याशेजारी नाल्यात उलटली. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला.
शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विजय मुरलीधर काकड (वय 45, रा.तोंडपूर,जि. जळगाव) स्विफ्ट डिझायर गाडीने पिंपळगाव रेणुकाई येथून धावडाकडे जात होते. पिंपळगाव रेणुकाई -लेहा रस्त्यावर आल्यावर बनकर फाट्याजवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पोलला धडकली. त्यांनतर गाडी तीनवेळा उलटून रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडली. गाडाखाली दबल्याने त्यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे.




























































