
कोरोनाला रोखण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी आता हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील कामगारांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. पालिकेच्या ए ते टी अशा 20 विभागांतील 18 ते 44 आणि 44 ते 60 वयोगटातील कामगारांचे लसीकरण करण्यात येणार असून या विभागातील कामगारांची नावे येत्या सोमवारी दुपारपर्यंत पालिकेने नमूद केलेल्या ई मेलवर पाठवण्याची सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. कामगारांच्या नावांची को-वीन अॅपवर केल्यानंतरच त्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
कोरोनाच्या काळात हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये तसेच अशाच प्रकारच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या कामगारांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या कामगारांचे लसीकरण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांबरोबर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी केली जाणार आहे.



























































