उत्तर प्रदेशात 18 वर्षीय तरुणावर बलात्कार, पीडित तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 18 वर्षीय तरुणावर त्याच्या मित्रांनी बलात्कार केला आहे. नंतर पीडित तरुणाने आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये दोन मित्रांनी त्याच्या 18 वर्षीय मित्राला एका गेस्ट हाऊसमध्ये नेले. तिथे दोघांनी त्याच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

मुलगा घरी आला आणि त्याने झालेली घटना सांगितली. नंतर आपल्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.