
कोरोनाची दुसरी लाट गेल्या काही दिवसांपासून ओसरत असून राज्यातील रुग्णसंख्येत झपाटय़ाने घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी राज्यात 10 हजार 291 नव्या रुग्णांची नोंद झाली. चांगली बाब म्हणजे नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱयांची संख्या दुप्पट आहे. राज्यातील 30 जिल्हे आणि महानगरपालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
राज्यात आज 10 हजार 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 21 हजार 81 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱयांची संख्या आता 55 लाख 64 हजार 348 इतकी झाली आहे, तर रिकव्हरी रेट 95.25 टक्के झाला आहे. राज्यात 1 लाख 74 हजार 320 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासांत 794 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 833 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 6 लाख 78 हजार 278 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 16 हजार 70 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुपटीचा दर 527 दिवसांवर पोहोचला आहे.



























































