दिल्लीत जिथे मतदान, तिथे मिळणार लस! मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind-kejriwal-aap

कोरोना महामारीचे संकट रोखण्यासाठी दिल्लीत यापुढे लसीकरणावर भर दिला जाणार आहे. लोकांमधील गोंधळ दूर करून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ‘जहां व्होट, वहा व्हॅक्सिनेशन’ अर्थात ज्या केंद्रावर मतदान केले  तिथेच नागरिकांना लस देण्याची योजना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीत भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. ऑक्सिजन आणि आरोग्य सुविधांच्या टंचाईमुळे प्रचंड मनुष्यहानी झाली. जवळपास महिनाभर दिल्ली सरकार आणि प्रशासनाची झोप उडवली होती. ऑक्सिजन पुरवठा आणि संसर्गाचा वेग कमी झाल्याने दिल्लीतील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेत नागरिकांची फरफट होऊ नये यासाठी ‘जिथे मतदान, तिथे लस’ ही योजना राबविण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.

दिल्लीत घरोघरी जाऊन लसीकरण करण्याला लवकरच सुरुवात केली जाईल. पुढील चार आठवडय़ांत 45 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.