सोलापुरात विडी कारखाने सुरू, रॅपिड टेस्ट करून तंबाखू, विडीपत्ता वितरित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
beedi-kills
सूचना: धूम्रपान आरोग्यासाठी धोकादायक आहे.

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून विडी कारखाने बंद होते. जकळपास 60 हजार महिलांना विडी उद्योगातून रोजगार मिळतो. कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाऊनमुळे विडी उद्योगातील महिलांना रोजगार नव्हता. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे शहरातील विडी कारखाने सुरू करण्यात आले आहेत. मात्र, तंबाखू आणि विडीपत्ता घेण्यासाठी आलेल्या सर्व महिलांची रॅपिड ऑण्टिजेन टेस्ट करूनच त्यांना तंबाखू आणि विडीपत्ता देण्यात आला.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या पुढाकाराने तीन प्रमुख विडी कारखान्यांत रॅपिड ऑण्टिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये ठाकूर सावदेकर विडी कारखाना, लंगर विडी कारखाना व साबळे टोबॅको विडी कारखाना येथे मोफत ऑण्टिजेन टेस्ट करण्याची सोय करण्यात आली होती.