
उत्तर कश्मीरमधीलल सोपोर शहरातदहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर तीन सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.
#UPDATE | Jammu & Kashmir | Two policemen and two civilians lost their lives in a terrorist attack in Sopore. Two other police personnel are injured. Lashkar-e-Taiba is behind this attack: Kashmir IG Vijay Kumar to ANI
(Visual deferred by unspecified time) pic.twitter.com/rWQIGiTX0a
— ANI (@ANI) June 12, 2021
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरातल्या मुख्य चौकात केंद्रीय राखीव दलाची तुकडी गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान व दोन सामान्य नागरिक ठार झाले. दुपारी बाराच्या सुमारास हा हल्ला झाला. जखमी झालेल्या चौघांना तत्काळ लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. या भागात लष्कराने शोध कारवाई सुरू केली आहे.
11 मे रोजी जम्मू कश्मीरच्या अनंतनागमध्ये लश्कर ए तैयबाचे तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. तेव्हा जम्मू कश्मीर पोलीस आणि सैन्याने संयुक्तपणे अभियान चालवले आणि चकमक उडालेली या चकमकीत तीन दहशतवादी ठार झालेले.
यापूर्वी 6 मे रोजी शोपियां जिल्ह्यात चकमक उडाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. तसेच एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले. सर्व दहशतवादी अल बदर दहशतवादी संघटनेचे होते.




























































