
कोरोना काळात अनेकांच्या नोकऱया गेल्या. कित्येकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यामुळे मिळेल ते काम करण्याची वेळ अनेकांवर आली. ओडिशाच्या कटकमधील विष्णुप्रिया स्वैन या विद्यार्थिनीने वडिलांची नोकरी गेल्यानंतर फूड डिलिव्हरीचे काम सुरू केले आहे. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी स्वतŠचे शिक्षण सांभाळून विष्णुप्रिया हे काम करत आहे. कटक शहरात झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरी करणारी ती पहिली मुलगी आहे.
विष्णुप्रियाचे वडील ड्रायव्हरचे काम करत होते. लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली. घरखर्चात जवळची सारी पुंजी संपली. तिचे पुटुंब आर्थिक संकटात सापडले. त्यानंतर विष्णुप्रियाने नोकरी शोधायला सुरुवात केली. झोमॅटोमध्ये तिची निवड झाली. या नोकरीसाठी ती बाईक चालवायला शिकली. गेल्या काही दिवसांपासून ती फूड डिलिव्हरीचे काम चोखपणे करत आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 6पर्यंत तिची डय़ुटी असते. त्याआधी सकाळी 6 ते 10 या वेळेत ती शेजारच्या मुलांना शिकवते. याशिवाय स्वतŠचा अभ्यासही तिने सुरू ठेवला आहे.
आईवडिलांना लेकीचा अभिमान
विष्णुप्रिया स्वैन हिला दोन लहान बहिणी आहेत. विष्णुप्रियाचे आईबाबा सांगतात की, त्यांना मुलगा नाही. पण त्यांची मुलगी मुलापेक्षा कमी नाही. विष्णुप्रिया खूप कष्ट करते. फूड डिलिव्हरीच्या कामातून वेळ मिळाला की ती तिचा अभ्यास करते.























































