वीज कर्मचाऱयांना कोरोनाचा झटका! आतापर्यंत 481 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीचा मोठा झटका महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांमधील कामगारांना बसला आहे. वीज अत्यावश्यक सेवेत येत असल्याने वीज कर्मचारी सातत्याने कर्तव्यावर आहेत. त्यामुळे आतापर्यंत 12 हजार 411 कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत, तर 481 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये नियमित आणि कंत्राटी असे जवळपास एक लाख 20 हजार अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते कार्यरत आहेत. लॉकडाऊनमुळे ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करणे आवश्यक असल्याने सर्वच वीज कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचा अनेकदा नागरिकांशी संपर्क येत असल्याने महावितरणमधील सर्वाधिक 7 हजार 774 कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून 276 कर्मचाऱयांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.