द्राक्ष व्यापाऱ्य़ाला दोन कोटी 80 लाखांना गंडा घालणाऱ्य़ा मध्यस्थाला गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. दुर्गाप्रसाद सत्यनारायण कुणा (वय 38, रा. जि. गोदावरी, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव असून, मिरजेतील पांडुरंग जगताप यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
दुबईतील ‘जानजबेल अल्-नजर फूडस्टफ ट्रेडिंग’ या कंपनीने जगताप यांच्याशी संपर्क साधून त्यांना द्राक्षखरेदीची ऑर्डर दिली होती. त्यानुसार जगताप यांनी सावळज, नागठाणे, जत, बिळूर येथील शेतकऱ्य़ाची द्राक्षे दुबईला पाठविली. कंपनीचे व्यवस्थापक सुबिध व आनंद देसाई यांनी तीन कंटेनर दुबईत पोहोचल्यानंतर तीन टप्प्यांत 25 लाख रुपये पाठविले. त्यानंतर आणखी 12 कंटेनर जगताप यांच्याकडून घेतले. 15 कंटेनरचे दोन कोटी 80 लाख रुपये येणे आहेत. शेतकऱ्य़ाना पैसे द्यायचे असल्याने जगताप यांनी कंपनीसोबत संपर्क साधला. मात्र, त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत 11 एप्रिलपासून त्यांचे फोन बंद केले होते.






























































