गुजरातमध्ये भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 9 जण एकाच कुटुंबातील सदस्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 10 पैकी 9 जण हे एकाच कुटुंबातील सदस्य होते.

गुजरातच्या आणंद जिल्ह्यात बुधवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ट्रक आणि एका गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात 2 लहान मुलं, दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातात ड्रायव्हरचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुःख व्यक्त केले.