विद्यार्थ्याच्या डुडलला 22 लाखांचे बक्षीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षी गुगलतर्फे डुडल स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही अनोख्या थीमवर स्पर्धा पार पडली. ‘मी मजबूत आहे कारण…’ ही यंदाची थीम होती. गुगलने नुकतीच ‘डुडल-2021’ स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा केली. यात अमेरिकेतील 11वीच्या विद्यार्थ्याने 22 लाखांचे पारितोषिक पटकावले. मिलो गोल्डिंग असे विद्यार्थ्याचे नाव आहे. ‘फाइंडिंग होप’ असे त्याच्या डुडलचे नाव आहे. एक किशोरवयीन मुलगा दुसऱया लहान मुलाला फुगा देत आहे. आशादायी, रंगीबेरंगी क्षण दर्शवणारी ही कलाकृती आहे. आपल्यातील बऱयाच जणांच्या भावना त्यातून प्रतिबिंबीत होत आहेत. असे क्षण आपण आयुष्यात कधीतरी अनुभवले आहेत, असे मिलो गोल्डिंग या विद्यार्थ्याने सांगितले.