
यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी आणि इंंटरमिजिएट या चित्रकला ग्रेड परीक्षेचे अतिरिक्त गुण मिळणार आहेत. विद्यार्थी ही परीक्षा ज्या ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्या ग्रेडनुसार वाढीव 7, 5 किंवा 3 गुणांची सवलत मिळणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱया शासकीय रेखा कला परीक्षा रद्द केल्या जाणार असून ज्या विद्यार्थ्यांनी आठवी आणि नववीत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केली आहे व यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसण्याची तयारी केली होती अशा सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत.
2020-21 या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी दहावीला बसले होते, त्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षा उत्तीर्ण केली आहे अथवा ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता आले नाही त्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी श्रेणी दिली जाणार आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ होणार आहे.
- वर्ष 2020-21 मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा 2020 चे आयोजन केले जाणार नसून कला शिक्षण प्रशिक्षण पदविका म्हणजे एटीडी आणि मूलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन कोर्स) या दोन्ही अभ्यासक्रमांना 2020 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून सूट देण्यात आली आहे. यासाठी उच्च शिक्षण विभागाने बुधवारी जीआर जारी केला आहे.



























































