खलाशांचे अग्रक्रमाने लसीकरण करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील मर्चंट नेव्ही अधिकाऱ्यांची सर्वात जुनी संघटना असलेल्या मुंबईस्थित ‘द मेरीटाइम युनियन ऑफ इंडिया’चे महासचिव अमर सिंग ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राहत असलेल्या 37 हजार सीफेरर्स म्हणजेच खलाशांचे अग्रक्रमाने लसीकरण करण्याबाबतची विनंती केली. कोविड लसीकरण न झाल्यामुळे खलाशांना मालवाहतूक जहाजांवर (कार्गो शिप्स) जाणे शक्य होत नसून त्यामुळे अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे ही बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. याप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.