
कोरोनाची रशियन व्हॅक्सिन ‘स्पुटनिक-व्ही’ लस लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. हैदराबादनंतर मुंबई, कोल्हापूरसह देशातील नऊ शहरांमध्ये लवकरच ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती हिंदुस्थानात या व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल करणाऱया डॉ. रेड्डी लॅबरोटरीजने दिली आहे.
देशात ‘स्पुटनिक-व्ही’ व्हॅक्सिनच्या पायलट सॉफ्ट लाँचला मुंबई, कोल्हापूर, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम, बड्डी आणि मिर्यालागुडा आदी शहरांमध्ये वाढवले जाईल. त्यानंतर शहरांची संख्या वाढवून बाजारात लस उपलब्ध करून देण्यात येईल.
कोविन प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशनसाठी सामान्यांना स्पुटनिक-व्ही लसीच्या कमर्शियल लाँचिंगपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सध्या हैदराबाद आणि दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्येही ही लस उपलब्ध आहे.



























































