‘मिस दिवा’साठी घरबसल्या द्या ऑडिशन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
miss-diva

‘मिस दिवा’ या सौंदर्य स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. ब्रॅंड लिवाच्या सहयोगाने या स्पर्धेच्या नवव्या सीझनची नुकतीच घोषणा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेसाठी यंदा डिजिटल मीडियाचा वापर करण्यात येणार आहे. इच्छुक तरुणी ऑडिशनसाठी घरबसल्या अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणी करताना ‘एमएक्स टकाटक’ या शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर एक विशिष्ट ऑडिशन टास्क मागवला आहे. त्यातून निवडलेल्या अंतिम 20 स्पर्धकांना मुंबई येथे प्रशिक्षण देऊन त्यांचे ग्रूमिंग करण्यात येईल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ग्रॅण्ड फिनाले पार पडेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 20 जुलैपर्यंत www.missdiva.com येथे अर्ज करता येईल.