मुंबईत लसीकरणाचे महारॅकेट, खासगी रुग्णालये आणि डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील ‘बोगस’ लसीकरणाचा प्रकार उघडकीस आला आणि मुंबईत खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी थेट मध्य प्रदेशात धाव घेतली आणि चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या चौघांनी दिलेली माहिती पोलिसांनाही चक्रावून टाकणारी असून लसीकरणाचे महारॅकेटच आता हाती लागणार आहे. या चौघांनी कांदिवलीतच नव्हे, तर नऊ ठिकाणी असे बोगस लसीकरण केले आणि लाखो रुपये कमावले. या रॅकेटमधील एक डॉक्टर फरारी असला तरी काही खासगी रुग्णालये आणि डॉक्टर्स पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

कसे व्हायचे लसीकरण

 महेंद्रचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून तो एका वैद्यकीय संघटनेशी संलग्न असल्याने त्याला मेडिकल पॅम्पबाबतची माहिती आहे, तर संजय गुप्ता हा पॅम्पच्या ठिकाणी जाऊन तेथे सुविधा पुरवण्याचे काम करत होता. चंदन आणि नितीन हे दोघे खासगी रुग्णालयात काम करतात. त्या दोघांनी खासगी रुग्णालयाचे बनावट लॉगिन आणि पासवर्ड तयार करून कोवीन या साइडवर अपलोड केले होते. त्या दोघांनी प्रमाणपत्रावर तारीख आणि वेळा या खोटय़ा टाकून ते प्रमाणपत्र ज्यांनी लस घेतली त्यांना दिले होते. तर एक जण हा लस आणायचे काम करत होता. पोलिसांना एका उपनगरातील रुग्णालयात काम करणाऱया मार्पेटिंग विभागाच्या प्रतिनिधीची माहिती मिळाली आहे. तो महेंद्रच्या संपर्कात असायचा. जे नागरिक लसीकरणासाठी त्या व्यक्तीकडे यायचे त्यांना तो महेंद्रचा नंबर देत असायचा आणि विश्वास बसावा म्हणून तो त्या लसीकरणाच्या ठिकाणी जायचा.

शिकाऊ परिचारिकांनी दिली लस

हिरानंदानी सोसायटीत झालेल्या लसीकरणाच्या वेळी शिकाऊ परिचारिकांनी ते इंजेक्शन दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लसीकरणाच्या दिवशी चारकोप येथील एका नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना तेथे लस टोचण्यासाठी बोलावले होते. हिरानंदानी सोसायटीत मे महिन्यात या टोळीने लसीकरण केले होते. प्रत्येकी 1260 रुपये घेऊन 390 जणांना त्यांनी लस टोचली. नंतर प्रमाणपत्राबद्दल संशय आल्याने रहिवाशांनी कांदिवली पोलिसांत धाव घेतली. अतिरिक्त पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे, विजय कांदळगावकर यांच्या पथकाने थेट मध्य प्रदेश गाठले. तेथे लपून बसलेल्या महेंद्र सिंग, संजय गुप्ता, चंदन सिंग आणि नितीन मोडे या चौघांना अटक करून मुंबईत आणले. महेंद्रच्या खात्यातून पोलिसांनी 9 लाख रुपये जप्त केले असून एका फरारी डॉक्टरचा शोध सुरू आहे.

लस की सलाईनचे पाणी? बॉलीवूडलाही घेरले

बोगस कोरोना लसीकरणाच्या रॅकेटने बॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्या कंपन्यांनाही आपल्या जाळय़ात खेचले आहे. ती नेमकी कोविशिल्डची लस होती की सलाईनचे पाणी याबाबत शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘टिप्स’ आणि ‘मॅचबॉक्स’च्या 500 कर्मचाऱयांची धाकधूक वाढली आहे.