भाजपच्या आयात केलेल्या प्रवक्त्याच्या वक्तव्यातून भाजपची ‘बॅग संस्कृती’ उघड – अमरनाथ पणजीकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपले सरकार वाचविण्यासाठी इतर पक्षातील आमदार आयात करण्याची भाजपची “बॅग संस्कृती” गोमंतकीयांना माहित आहे. भाजपचे आयात केलेले प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केलेल्या वक्तव्याने भाजपची ही ‘बॅग संस्कृती’ परत एकदा उघड झाली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या गोवा भेटीबद्दल उर्फान मुल्ला यांनी केलेल्या वक्तव्याचा पणजीकर यांनी निषेध केला आहे.

भाजपचे आयात केलेले प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केलेले वक्तव्य म्हणजे भाजपच्या अंतर्गत कारभाराचे प्रतिबिंब आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या नपकत्याच झालेल्या गोवा भेटीच्या वेळी त्यांनी गोळा केलेल्या बॅग पोचविण्याचे काम उर्फान मुल्ला यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळेच त्यांना भाजपच्या बॅग संस्कृतीची माहिती मिळाली असावी, असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

भाजपचे आयात केलेले प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी बी. एल संतोष यांनी मागील गोवा भेटीत किती बॅग गोळा केल्या त्याची माहिती जनतेला द्यावी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारला टेकू लावण्यासाठी गोव्यातील आयात केलेल्या आमदारांना किती बॅग दिल्या होत्या याची माहिती त्यांनी घ्यावी व जनतेला द्यावी, असेही ते म्हणाले.

भाजपने आयात केलेले प्रवक्ते उर्फान मुल्लांना निवडणूक युतीच्या बाबतीत कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी कॉंग्रेस समर्थ असून आयात केलेल्या भाजप प्रवक्त्याला त्याबद्दल माहिती देण्याची आम्हाला गरज नाही. पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश राव यांच्यावर भाजप प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याचा निषेध करुन उर्फान मुल्ला यांनी माफी मागावी, अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे.