सव्वासात लाखांचे शर्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाका येथील कपडय़ाच्या गोदामातून सव्वासात लाख रुपयांचे शर्ट चोरी करणाऱया दोघांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. गणेश श्रीकांत सोनुर्लेकर आणि तोलमनी श्रीराम चौधरी अशी या दोघांची नावे असून त्या दोघांकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.

जगदीप सिंग सायनी हे कपडे व्यावसायिक असून त्याचे साकीनाका येथे गोदाम आहे. त्या गोदामात त्यांनी विविध ब्रॅण्डचे शर्ट ठेवले होते. काही दिवसांपूर्वी काही अज्ञात क्य्कतीने गोदामाचे टाळे तोडून त्यातून सक्वासात लाख रुपयाचे शर्ट चोरून पळ काढला होता. शर्ट चोरीप्रकरणी जगदीप सिंग यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. साकीनाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील उपनिरीक्षक उमेश दगडे, टोपले, ढवळे, करांडे, कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी गणेश आणि तोलमनीला पोलिसांनी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्या दोघांनी शर्ट चोरल्याची पोलिसांना कबुली दिली. त्या दोघांकडून पोलिसांनी चोरीला गेलेले शर्ट जप्त केले आहेत. शर्ट चोरीप्रकरणी गणेश आणि तोलमनीला अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या दोघांनी या पूर्वी कुठे अशा प्रकारच्या चोऱया केल्या आहेत का याचा तपास साकीनाका पोलीस करत आहेत.