
मुंबईसह राज्यात शिवसेनेचा 55वा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि उपनगरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, लसीकरण मोहीम, अन्नदानासह विविध कार्यक्रमांची रेलचेल मुंबईत ठिकठिकाणी दिसून येत असून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्र. 49 च्या पी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा व नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्याकडून मढ शाखेत ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजसेवक संजय सुतार, मालाड विधानसभा प्रभारी किरण कोळी, नितीन कास्कर, जयश्री म्हात्रे, संदेश घरत, महिला शाखा संघटक संगीता कोळी, युवासेना शाखाप्रमुख राजू कोळी उपस्थित होते.
युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून कुर्ला विधानसभेतील नागरिकांसाठी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या प्रयत्नाने चेंबूर समाजमंदिर हॉलमध्ये मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभागाच्या सहकार्याने कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर, सचिव सुरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेना शाखा क्र.104 शाखाप्रमुख संजय दळवी यांच्या वतीने शिवसेना प्रभागातील नागरिकांना मोफत छत्र्यावाटप करण्यात आल्या. त्याप्रसंगी उपनेते शिशिर शिंदे, विभाग संघटक संध्या वढावकर, उपविभागप्रमुख दिनेश जाधव, शाखाप्रमुख आनंद पवार, उपविभाग संघटक शीतल पालांडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना विभागप्रमुख अॅड. अनिल परब आणि महिला विभाग संघटक राजुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्र.63च्या महिला शाखा संघटक आणि सृष्टी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा नंदिता खान यांच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड येथे राहणाऱया लहान बालकांस खाऊ आणि मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी वर्सेवा विधानसभा समन्वयक शैलेश फणसे, महिला उपविभाग संघटक जयश्री मोरे, शाखाप्रमुख सुबोध चिटणीस, एम. के. मेमन, श्रुती शर्मा, शाखा अधिकारी अंकिता गुरव आदी उपस्थित होते.


























































