महाराष्ट्रात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसींच्या कमतरतेमुळे मंदावलेल्या राज्यातील लसीकरण मोहिमेला उद्यापासून पुन्हा वेग येणार आहे. आतापर्यंत 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत होते. मात्र आता लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्यापासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली.

राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण

राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने चिंता वाढली आहे. रत्नागिरीत 9, जळगाव 7, मुंबई 2 तर पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज  दिली. जिनोमिक सिक्वेनसिंगसाठी  प्रत्येक जिह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.