
कोरोना काळात मुंबईतील गरीब, गरजू तसेच ज्येष्ठांना शिवसेनेने मोफत मास्क, सॅनिटायझर्स तसेच औषध व अन्नधान्यांचे वाटप केले असून नेहमीच मदतीचा हात दिला आहे. मुंबईत सध्या निर्बंध असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने 24 तास खुली असून इतर दुकानांवर वेळेचे बंधन आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शाखा आणि पालिका प्रभागांमधून धान्य व छत्र्यांचे मोफत वाटप करून गरीब, गरजू, ज्येष्ठ शिवसैनिक आणि रहिवाशांना दिलासा देण्यात आला.
शिवडी विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱयांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार अजय चौधरी, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, महिला संघटक लता राहटे, रुपाली चांदे, दिव्या घाडीगावकर, शाखा संघटक कांचन घाणेकर.
युवा सेना शाखा क्र. 70 च्या माध्यमातून युवा शाखा अधिकारी हंसराज गुप्ता यांच्या वतीने युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, युवा सेना कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, विधानसभा संघटक संजय कदम, विधानसभा समन्वयक सुनील खाबिया जैन यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करून छत्री वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला विभाग संघटक वीना टॉक, उपविभागप्रमुख शरद जाधव, शाखाप्रमुख संजय जाधव आदी उपस्थित होते.
विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांच्या सहकार्याने महिला विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या उपस्थितीत शाखाप्रमुख सचिन पाटील आणि युवासेना मुंबई समन्वयक प्रकाश नाटेकर यांच्या पुढाकाराने प्रभाग क्र. 29 च्या वतीने छत्री वाटप करण्यात आले. यावेळी उत्तर भारतीय विभाग संघटक कमलेश यादव, पुरुषोत्तम मोरे, संतोष धनावडे, सुवर्णा कोठावळे, रवींद्र वेदपाठक उपस्थित होते.


























































