
भंडारदरा पाणलोटात पाऊस पुन्हा सुरू झाला असून, धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे. मुळा पाणलोटातही जोरदार सरी कोसळत असल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढला असून, पिंपळगाव खांड धरण आज ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुळावरील आंबित धरणही भरलेले आहे.
भंडारदरा, घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत रविवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. रविवारी सायंकाळी 6 वाजता भंडारदरात 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सायंकाळी भंडारदरातील पाणीसाठा 5329 दलघफू होता. विद्युतगृह क्रमांक 1 मधून 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
मुळा पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. पावसात वाढ झाल्याने मुळा नदीचा प्रवाह वाढला आहे. मुळावरील आंबित धरण यापूर्वी भरले असून, आता मुळा नदीचा प्रवाह पिंपळगाव खांड धरणात स्थिरावत आहे. 600 दलघफूट क्षमतेच्या या धरणाचा पाणीसाठा 80 टक्क्यांहून अधिक झाला असून, धरण ओव्हरफलो होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, अकोले-कोतूळ मार्गावरील कोतूळ पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी पांगरी, मोग्रसमार्गे वळविण्यात आली आ























































