आईशप्पथ!  2800चे बिल, वेटरला दिली 12 लाखांची टीप!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवायला गेल्यानंतर आपण वेटरला फार फार तर 50-100 रुपयांची टीप देतो. परंतु वॉशिंग्टन येथील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरला गेलेल्या एका व्यक्तीने वेटरला चक्क 12 लाख रुपयांची टीप दिली आहे. या रेस्टॉरंटच्या मालकाने सोमवारी बिलाची पावती फेसबुकला पोस्ट केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

कोरोनामुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. हॉटेलात येणाऱया ग्राहकांची संख्यादेखील रोडावली आहे. हीच परिस्थिती पाहता हॅम्पशायरमधील एका ग्राहकाने 16000 डॉलर टीप देण्याचा निर्णय घेतला. खरंतर डिनरला गेलेल्या या ग्राहकाचे बील फक्त 2800 रुपये झाले होते. न्यू हॅम्पशायर येथील लंडन डेरीमधील स्टंबल इन बार अँड ग्रील या रेस्टॉरण्टचे मालक मायकल जरेला यांनी या बिलाची पावती फेसबुककर शेअर केली आहे. या दिलदार ग्राहकाचे नाव जाहीर न करता उदार कृतीसाठी त्यांचे आभार मानले. टीपची रक्कम आठ बार टेंडर्स आणि किचन वर्कर्सना वाटण्यात आली.