‘या’ मुलाचे वय अवघे 13 पण वजन ऐकाल तर चकीत व्हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील एका 13 वर्षीय मुलाची सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्या मुलाचे वय जरी 13 असले तरी त्याचे वय मात्र 140 किलो आहे. हे त्याच्या वयाच्या मुलांच्या सरासरी वजनाच्या तब्बल चौपट वजन आहे. या मुलाने वजनाच्या बाबतीतले देशातले सर्व रेकॉर्ड तोडले आहे. या मुलाचे कुटुंब गरीब असून ते त्याच्यावर उपचारासाठी खर्च करू शकत नाहीए.

सादर असे त्यामुलाचे नाव असून तो अमरेली जिल्ह्यायतील धारी गावातील रहिवासी आहे. लहानपणापासून सागरला वेग वेगळे पदार्थ खाण्याची आवड. जेव्हा तो जन्मला आला तेव्हा तो सामान्य मुलांसारखा तीन साडेतीन किलो वजनाचा होता. मात्र जसे त्याने अन्नपदार्थ खायला सुरुवात केली. त्याचे वजन वाढू लागले. सुरुवातीला कुटुंबीयांना वाटले की खाण्यापिण्यामुळे मुलाचे वजन वाढते आहे. मात्र नंतर तो अधाशासारखे खाऊ लागला. त्याला खाताना थांबवणं कुटुंबीयांसाठी कठिण व्हायचं.

हा मुलगा एका दिवसाला मोठ्या मोठ्या सात बाजरीच्या भाकऱ्या व तेवढाच भात खातो. सागरचे वडिल शेतकरी असून ते त्याच्यावरील उपचाराचा खर्च करू शकत नाही. तसेच त्याला दररोज पुरेल इतकं जेवणही देऊ शकत नाही. त्यामुळे सागरच्या वडिलांनी त्याच्या उपचारासाठी गुजरात सरकारने मदत करावी असे आवाहन केले आहे.