
मुंबईचे सध्याचे होमगार्डचे संचालक परमबीर सिंह हे प्रदीर्घ रजेवर गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एपीआय सचिन वाझेला एनआयएने अटक केल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचीही आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली व त्यांची होमगार्डचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही पोलीस निरीक्षकांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले.
त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू असताना होमगार्डचे संचालक परमबीर सिंह अचानक रजेवर गेले. गेल्या महिनाभरापासून ते रजेवर असल्याचे सांगण्यात येते. आपण आजारी असल्याचे त्यांनी चंदिगढच्या वैद्यकीय अधिकाऱयांचे प्रमाणपत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी आपण आजारी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या खात्याचा कार्यभार नागरी संरक्षण विभागाचे संचालक व्यंकटेशम् यांच्याकडे देण्यात आला आहे.





























































