
कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसकणारा अभिनेता नीलेश दिवेकर आता हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचा ‘जून’ हा चित्रपट प्लॅनेट मराठी या नव्याकोऱया ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजपासून प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने मारलेल्या गप्पांमध्ये नशिबाने हा चित्रपट मिळाल्याचे नीलेशने सांगितले.
मैत्रीपलीकडच्या नात्याची गोष्ट मांडणाऱया जूनमध्ये नीलेश दिवेकर अगरकाल नावाची व्यक्तिरेखा साकारतोय. भूमिकेविषयी तो म्हणाला, आजवर विनोदी भूमिका खूप केळा साकारल्या आहेत. जूनमधील माझी भूमिका वेगळ्या जॉनरची आहे. माझा लूकही वेगळा आहे. अगरकाल हे सनकी टाईप कॅरेक्टर आहे. जो लोकांना दाखवतो एक आणि आतून वेगळाच असतो.
भूमिकेसाठी निवड कशी झाली याबाबत तो म्हणाला, खरंतर मला नशिबाने हा चित्रपट मिळालाय. ऑडिशनमध्ये निवड झाल्यावर इतर चित्रपटांत व्यस्त असल्याने माझ्याकडे या चित्रपटासाठी तारखा उपलब्ध नव्हत्या. परंतु निर्माते निखिल महाजन आणि कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांनी माझ्या तारखांनुसार शूटिंगच्या शेडय़ूलमध्ये बदल केला. सहाय्यक कलाकाराच्या बाबतीत असे कधीच होत नाही.
ओटीटीकर कंटेंट हाच स्टार!
ओटीटीकर कंटेंट हाच खरा स्टार आहे. बॉक्स ऑफीसवर स्टारडमवर चित्रपट चालत असले तरी ओटीटीवर मात्र हा नियम लागू होत नाही. असे असते तर बडय़ा स्टारचे चित्रपटही इथेही चालले असते, असे नीलेश म्हणाला, आगामी काळात तो एका बडय़ा बॅनरच्या केबसिरीजमध्ये झळकणार आहे. याबाबत विचारल्याकर केट ऍण्ड कॉच असे तो म्हणाला.































































