
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्यात पुन्हा निर्बंध लागू केले असले तरी रुग्णवाढीचा आलेख अजूनही खाली आलेला नाही. राज्यात गेल्या 24 तासांत 9196 नवीन रुग्णांची नोंद झाली. विदर्भ व मराठवाडय़ाची स्थिती मात्र सुधारली असून विदर्भात दिवसभरात 198 रुग्णांची, तर मराठवाडय़ात 396 रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर, पुणे व मुंबई विभागात. मात्र अजूनही रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी गेल्या दोन आठवडय़ांपासून रोज सरासरी 9 ते 10 हजार नवीन रुग्णांची नोंद होते आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील स्थिती अजूनही पूर्णतŠ नियंत्रणात आलेली नाही. आज राज्यात 9 हजार 195 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 8 हजार 634 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.01 टक्के असले तरी बरे होणाऱया रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांचा आकडा अधिक होत असल्याने चिंता वाढली आहे. राज्यात आज 252 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 22 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या राज्यात 1 लाख 16 हजार 667 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. 6 लाख 15 हजार लोक होमक्वारंटाईनमध्ये, तर 4 हजार 339 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. गेल्या 24 तासांत सुमारे 9 हजार दोनशे रुग्णांची नोंद झाली असली तरी हे रुग्ण प्रामुख्याने मुंबई,पुणे व कोल्हापूर विभागातील आहेत. मुंबई शहरासह ठाणे, रायगड व पालघर या तीन जिह्यांत 2004 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे विभागात 2610, तर कोल्हापूर विभागात 3266 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नगर जिह्याचा अपवाद वगळता नाशिक विभागाची स्थितीही सुधारली आहे. नाशिक विभागात दिवसभरात 721 नवीन रुग्ण आढळून आले असून यातील 443 रुग्ण एकटय़ा नगर जिह्यातील आहेत. विदर्भातील अकोला व नागपूर विभागात अनुक्रमे 114 व 84 रुग्णांची नोंद झाली आहे. मराठवाडय़ातही संभाजीनगर व बीड जिल्हे वगळता सर्व जिह्यांतील रुग्णवाढीचा आकडा बराच कमी आहे. संभाजीनगर विभागात 204 व लातूर विभागात 192 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.




























































