संतोष जुवेकर वेब सिरीजमध्ये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पिंग पाँग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच येऊ घातलेल्या ‘हिडन’ या वेब सिरीजच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. वेब सिरीजमध्ये अभिनेता संतोष जुवेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याबाबत संतोष म्हणाला, ‘हिडन’मध्ये माझी अत्यंत वेगळी भूमिका आहे. यात मी एसीपीची भूमिका साकारतोय. हा अनुभव माझ्यासाठी रोमांचक आहे. प्रचंड मेहनत घेऊन आमच्या टीमने ही वेब सिरीज तयार केली आहे. ‘हिडन’मध्ये दडलंय काय? याचं रहस्य 16 जुलैला ‘पिंग पॉंग’ ओटीटीवर उलगडणार आहे. जीवन जाधव यांनी ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंटद्वारे ‘पिंग पॉंग’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉंच केला आहे.