एकाच वेळी जन्माला आलेल्या तीन बहिणी, आता आहेत गरोदर…प्लॅनिंग ऐकून आश्चर्यचकित व्हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही वेळा दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले एकाच वेळी जन्मतात. एकाच वेळी जन्माला आल्याने त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी करताना काही वेळा ते एकमेकांसोबत असतात. अशीच एक घटना अमेरिकेतली कॅलिफोर्निया येथे घडली आहे. येथे एकाच वेळी जन्माला आलेल्या तिघीही बहिणी आता काही महिन्यांतच ‘आई’ होणार आहेत. त्यांचे प्लॅनिंग वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या या बहिणींची नावे गिना, नीना आणि व्हिक्टोरिया अशी आहेत. या तिघींचे वय 35 वर्षे आहे. या तिनही बहिणींचे एकमेकींवर अतिशय प्रेम आहे. सगळ्यात आधी व्हिक्टोरिया आणि नीना या दोन बहिणी गरोदर राहिल्या. तेव्हा त्यांनी गिनालासुद्धा आई होण्याची तयारी करण्यास सांगितले. आम्हा बहिणींमध्ये जसे प्रेम आहे तसेच प्रेम आमच्या मुलांमध्येही निर्माण व्हायला हवे, असे या बहिणींना  वाटते.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी व्हिक्टोरियाने सांगितले की, ‘आम्ही तिघीही एकाच वेळी गरोदर राहिलो. हे आमच्यासाठी एखादे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे’. या तीनही बहिणींनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण एकत्रच पूर्ण केले. गिनानेही व्हिक्टोरिया आणि निनाची गोड बातमी कळल्यावर आई होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आश्चर्य म्हणजे आता तिघीही एकाच वेळी गरोदर असून काही महिन्यांच्या अंतराने तिघीही आपआपल्या बाळांना जन्म देणार आहेत.