
रिलायन्स जियोने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज सुविधा जारी केली आहे. यामध्ये ग्राहकांना पैसे न देता रिचार्ज करता येणार आहे. या रिचार्जमध्ये ग्राहकांना एक जीबी डेटा मिळणार आहे.
अनेकवेळेला ग्राहकांना पैश्यांची अडचण असते किंवा तांत्रिक अडचणीमुळे पैसे भरून रिचार्ज करता येत नाही. अशा ग्राहकांसाठी जियो खास लोन रिचार्जची सुविधा जारी केली आहे. या रिचार्जची किंमत 11 रुपये असून त्यात ग्राहकांना 1 जीबीचा डेटा मिळतो.
रिचार्ज कसा करायचा
सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील My Jio ऍप ओपन करा.
त्यात डाव्या बाजूला मेन्युवर क्लिक करा
तिथे सर्व्हिस ऑप्शनवर इमरजेन्सी डेटा लोनवर क्लिक करा
त्यात गेट इमरजेन्सी डेटावर क्लिक करा
त्यात 1GB डेटा प्लॅनसाठी ऍक्टिव्ह बटनावर क्लिक करा.
ऍक्टिव्ह बटनावा क्लिक केल्यावर तुमचा एक जीबी डेटाचा प्लॅन ऍक्टिव्ह होईल
नंतर My Jio ऍपवर क्लिक करून हे पैसे तुम्ही भरू शकता.





























































