
टोकियो ऑलिम्पिकचा थरार 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे. पण यंदा क्रीडाप्रेमींना आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ स्टेडियम्समध्ये जाऊन बघता येणार नाहीए. जपानमध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जपान सरकारकडून टोकियो ऑलिम्पिकच्या काळात आणीबाणी लावण्यात येणार आहे. तसेच क्रीडा गावात प्रेक्षकांनाही ‘नो एण्ट्री’ करण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.
बंद स्टेडियममध्येच खेळ रंगणार
जपान सरकारकडून चौथ्या आणीबाणीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. तसेच जपानी सरकारमधील मंत्री व एक्सपर्ट यांच्यामध्ये गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून यात कोरोना व ऑलिम्पिकचे आयोजन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. बंद स्टेडियममध्येच ऑलिम्पिक पार पडेल, असे जपान सरकारमधील सीनियर मंत्र्याकडून सांगण्यात आले.























































