KGF Chapter 2 चा नवीन पोस्टर लीक, यशच्या मनमोहक अदांवर चाहते घायाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटामुळे आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा सतत बदलल्या जात आहेत. कोरोना विषाणूमुळे थिएटर बंद आहेत. शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनचे कामही ठप्प झाले आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यास भाग पडले आहे. दाक्षिणात्य अभिनेता यश याच्या ‘केजीएफ चॅप्टर 2’ चित्रपटाची तारीख सतत पुढे ढकलण्यात येत आहे. याच दरम्यान चित्रपटाचा एक पोस्टर लीक झाला आहे.

केजीएफ चॅप्टर 2 हा लीक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या पोस्टरमध्ये यशचा ढासू लूक पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये यशच्या समोर आग जळत असून तो खुर्चीवर काळ्या रंगाचा कोट-पँट घालून बसलेला दिसत आहे. यशचे चाहते ट्विटरवर हा पोस्टर शेअर करत हा चित्रपटाचा नवीन पोस्टर असल्याचे लिहीत आहेत.

‘केजीएफ 2’ च्या प्रदर्शनासंदर्भात वेगवेगळे अनुमान वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी 16 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर आता बातम्या येत आहेत की हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होईल. हा बहुप्रतिक्षित चित्रपट दिवाळीच्या दिवशी निर्माते प्रदर्शित करू शकतात असेही बोलले जात आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर निर्माते हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करणार आहेत.