रत्नागिरीतील बावनदीला पूर, नदी शेजारील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात गेले चार दिवस पावसाचा जोर कायम आहे. काही वेळाच्या विश्रांतीनंतर परत पावसाच्या दमदार सरी कोसळत असल्यामुळे  सोमवारी बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. मंगळवार- बुधवार कोसळत असलेल्या संततधारेने बावनदीला आज पूर आल्याने भातशेतीत पाणी घुसले होते. त्यामुळे असाच पाऊस पडत राहिल्यास भातशेती कुजण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील सप्तलिंगी, वांद्री, उक्षी, मानसकोंड, परचुरी, कोळंबे, आदी भागात पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज  पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.