
राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 8 हजार 10 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याचे दिसत आहे. काल 8 हजार 602 रुग्णांचे निदान झाले होते, तर आज एकूण 7 हजार 391 इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आज एकूण 170 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. राज्यातील मृत्युदर 2.04 टक्क्यांवर सरकला असून आतापर्यंत एकूण 59 लाख 52 हजार 192 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के एवढे झाले आहे. पुणे जिल्हय़ात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्हय़ात हा आकडा 17 हजार 401 इतका आहे, तर पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्हय़ात एकूण 15 हजार 653 इतके रुग्ण आहेत.





























































