
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून 3 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास खराडातील रक्षकनगर फेज दोनमध्ये घडली. याप्रकरणी महिलेने चंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला कुटूंबीयासह रक्षकनगर सोसायटीत राहायला आहेत. कामानिमित्त त्या गावाला गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 3 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. गावाहून परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जी. पी. जाधव तपास करीत आहेत.
बॅट खरेदीच्या बहाण्याने दुकानाराला 50 हजारांचा गंडा
पुणे- खडकीतील आर्मी पब्लिक स्कूलमधून बोलत असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने दुकानदाराला 20 बॅट खरेदी करण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून घेत तब्बल 50 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना 12 जुलैला कर्वेनगरमधील पोतनीस परिसरात घडली. याप्रकरणी दुकानदाराने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.






























































