
चिपळूण आणि खेड येथील पूरग्रस्तांना आज शिवसनेच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चिपळूण तालुक्यात मार्केंडी आणि मुरादपूर येथे आणि खेड शहरातील पूरग्रस्तांना पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.
मुंबईतून ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू जिह्यात दाखल झाल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू झाले आहे. मार्केंडी, मुरादपूर आणि खेड येथे प्राथमिक स्वरूपात मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अॅड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, बाळा कदम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






















































