आनंदी आनंद गडे, व्हॉट्सऍपचे नवे ऍनिमेटेड स्टिकर्स पॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅप कंपनी ऑनिमेटेड स्टिकर्स पॅक वरचेवर सादर करत असते. आताही कंपनीने युजर्ससाठी ‘हॅपियर दॅन एव्हर’ हे खास स्टिकर पॅक आणले आहे. या ऑनिमेटेड स्टिकरसाठी अमेरिकन गायिका बिली इलीश हिच्यासोबत करार करण्यात आला आहे. बिली इलीशच्या ‘हॅपियर दॅन एव्हर’ या लोकप्रिय गाण्यावर आधारित स्टिकर आहे. त्याचे संगीत लोकांच्या मनाचा वेध घेत आहे.

याआधी व्हॉट्सअॅपने अर्थ डे 2021 आणि रमझानचे औचित्य साधून खास स्टिकर रोल आऊट केले होते. अलिकडेच व्हॉट्सअॅपने जागतिक आरोग्य संघटनेसोबत विशेष स्टिकर पॅक लाँच करण्यासाठी भागीदारी केलेली आहे. आताही व्हॉट्सअॅपने ‘हॅपियर दॅन एव्हर’ सादर केले आहे. यासंदर्भात कंपनीने ट्विट करून माहिती दिली आहे. स्टिकर पॅकमध्ये 15 सेकंदाच्या व्हिडियो स्निपेटचाही वापर केला आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे अन्य स्टिकरप्रमाणे ‘हॅपियर दॅन एव्हर’ स्टिकरला डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. व्हॉट्सअॅपने दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे खास स्टिकर पॅक वापरता येतील. त्यासाठी आपल्या स्मार्टफोनमधील फक्त 1.2 एमबी जागा वापरली जाईल.