पुणे शहरातील विविध भागातून बुलेटसह इतर दुचाकींसह चोरी करणाऱ्या दोघांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मारूती माधव गिरी (वय 22 रा. हडपसर, मूळ-परभणी ) आणि उमेश भारत चौगुले (वय 22, रा. मांजरी बुद्रूक, मूळ- मंगढवेढा, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दरोडा व वाहनचोरी विरोधी दोन पथकाकडून हद्दीत पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी मुंढव्यातील केशवनगरमध्ये दोघेजण दुचाकीजवळ संशयास्पद उभा असल्याची माहिती पोलीस नाईक शिवाजी जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी ताब्यातील दुचाकी चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. त्यांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाच्या कार्यालयात आणून चौकशी केली असता, तब्बल 12 दुचाकीचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 85 हजारांच्या 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डीसीपी श्रीनिवास पाटील, एसीपी लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, एपीआय विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, उदय काळभोर, राजेश अभंगे, दीनकर लोखंडे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, शाकीर खान, मनोज शिंदे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, दत्तात्रय खरपुड, अमोल सरतापे यांनी केली.






























































